छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वाळूज बजाजनगर एक्स्पर्ट कॉम्प्युटर परिसरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यांचा अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास रामराव यवतीकर (४०, रा. श्रीरामनगर, कमळापूर, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील एक्स्पर्ट कॉम्प्युटर परिसरातून त्यांचा मुलगा सोहम देविदास यवतीकर (१५) व राहुल अनिल गोरे (१६) हे दोघे अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाले. नातेवाइकांकडे व
इतरत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. अज्ञात व्यक्तीने या दोघांचे अपहरण केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिम हवालदार सूर्यवंशी करत आहेत. सोहम यवतीकर याची उंची ५ फूट असून तो सडपातळ बांध्याचा व सावळ्या रंगाचा आहे. त्याने काळी जिन्स व पांढरा शर्ट घातलेला आहे, तर राहुल गोरे हा ५ फूट २ इंच उंचीचा, सडपातळ व सावळ्या रंगाचा असून त्याने काळी जिन्स व चेक्स टी-शर्ट परिधान केला आहे. या वर्णनाच्या मुलांबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












